सरपंच सेवा संघटना जिल्हा संघटक प्रवीण गवस यांचे रुग्णवाहिकेसाठी पुन्हा आमरण उपोषण

सरपंच सेवा संघटना जिल्हा संघटक प्रवीण गवस यांचे रुग्णवाहिकेसाठी पुन्हा आमरण उपोषण

दोडामार्ग /-

साटेली- भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला वारंवार मागणी करून देखील रुग्णवाहिका न मिळाल्याने सरपंच सेवा संघटना जिल्हा संघटक प्रविण गवस यांच्या नेतृत्वाखाली आज साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी भर पावसात पं.स.दोडामार्ग येथे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी १५ दिवसात रुग्णवाहिका दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्या आश्वासनांची पुर्तता न झाल्याने आज पुन्हा एकदा आरोग्य केंद्रासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
आजुबाजुचे सर्व गावे साटेली भेडशी आरोग्य केंद्रावर अवलंबुन आहेत. परमे,घोटगे,मांगेली,शिरंगे , केर, भेकुर्ली, मोर्ले, विजघर,हेवाळे अशा अनेक गावांना या ठिकाणी तपासणी साठी यावे लागते मात्र या ठिकाणी सुसज्ज रुग्णवाहिका नसल्यामुळे रुग्णांचे हाल होतात.त्यामुळे असे रुग्णांचे हाल होवू नये यासाठी सरपंच सेवा संघटना जिल्हा संघटक प्रविण गवस हे आज पासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
यावेळी साटेली भेडशी सरपंच लखु खरवत, साटेली भेडशी उप सरपंच गणपत डांगी, सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई, क्षितीज मणेरकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..