उपजिल्हा रुग्णालय आवारात स्वॅब टेस्टिंग सेंटर कार्यान्वित..

उपजिल्हा रुग्णालय आवारात स्वॅब टेस्टिंग सेंटर कार्यान्वित..

सावंतवाडी /-

सावंतवाडी तालुक्यातील स्वॅब टेस्टिंगची स्वतंत्र यंत्रणा उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात आली आहे. पर्णकुटी विश्रामगृहावर असलेले हे स्वॅब टेस्टिंग सेंटर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत हे स्वॅब टेस्टिंग सेंटर सुरु ठेवण्यात येणार आहे. या सेंटरचे फिव्हर क्लिनीक किंवा ताप सेंटर चिकित्सालय असे नामकरण करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये दोन वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..