कुडाळ तालुका खड्डेमय झाला असून हे खड्डे तात्काळ बुजवा.;शिवसेना पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांना ईशारा..

कुडाळ तालुका खड्डेमय झाला असून हे खड्डे तात्काळ बुजवा.;शिवसेना पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांना ईशारा..

कुडाळ /-


कुडाळ तालुका खड्डेमय झाला असून हे खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा शिवसेना स्टाईलने काम करण्यास भाग पाडू अशा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देताच सुप्तावस्थेत असलेला सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला पाऊस कमी होताच काम सुरू केले जाईल असे यावेळी उपअभियंता पाटील व श्री बिरांडे यांनी सांगितले,.

कुडाळ तालुक्यात ग्रामीण भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे डांबरीकरण रस्ते खड्डेमय होऊन अक्षरशः चाळण झाली आहे या खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताची संख्या वाढली आहे या गंभीर प्रश्नाकडे कुडाळ तालुका शिवसेना शिवसेना पदाधिकारी यांनी कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागात धडक देऊन अधिका-यांना जाब विचारला यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे, उपसभापती जयभारत पालव कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, विकास कुडाळकर कुडाळ शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट, कुडाळ शिवसेना ओबीसी प्रमुख राजु गवंडे, वारंगाची तुळसुली उपसरपंच विजय वारंग, युवासेनेचे जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर, माजी जि प सदस्य संजय भोगटे शिवसेना उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, युवासेनेचे वालावल पंचायत समिती विभाग प्रमुख मितेश वालावलकर कुडाळ तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख बाळु पालव शिवसेनेचे उपसभापती जयभारत पालव पिंगुळी जि प मतदारसंघ विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर आदी उपस्थित होते यावेळी अतुल बंगे यांनी कुडाळ तालुक्यातील अनेक रस्त्यांची चाळण झाली असताना रस्ते मंजुर असुन तोपर्यंत खड्डे तातडीने बुजवा नाहीतर शिवसेना स्टाईलने हीसका दाखवु असा इशारा देताच आजपासून खड्डे बुजवण्याचे काम सुरू करीत आहोत असे उपअभियंता पाटील व श्री बिरांडे यांनी सांगितले तसेच पिंगुळी ते पाट, कुडाळ ते कवठी, कुडाळ ते नेरूरपार रस्ता मंजुर असुन निविदा प्रक्रिया सुरू आहे असेही सांगितले.

अभिप्राय द्या..