You are currently viewing सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून व प्रयत्नातून”सायकल बॅक” अंतर्गत शिरोडा येथे१० गरीब विद्यार्थिनींना सायकल वितरण..

सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून व प्रयत्नातून”सायकल बॅक” अंतर्गत शिरोडा येथे१० गरीब विद्यार्थिनींना सायकल वितरण..

वेंगुर्ला /-


मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र संकल्पनेतर्गत जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा माजी खासदार सुरेश प्रभु (शेर्पा भारत सरकार) यांच्या प्रेरणेतून व प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण गोवा यांचे CSR निधीतून “सायकल बॅक” अंतर्गत या योजनेत बसणाऱ्या शाळेमधून निवडण्यात आलेल्या दहा गरीब विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटपचा कार्यक्रम मंगळवारी गुरूवर्य वि.स.खांडेकर विदया प्रतिष्ठान शिरोडा संचलित गुरुवर्य अ.वि.बावडेकर हायस्कूल शिरोडा येथे झाला. यावेळी या परिवर्तन केंद्राचे समन्वयक विलास हडकर, यांनी “सायकल बॅक” योजनेचे उद्दिष्टाबद्दलची व संस्थेच्या भविष्यातील योजनेची माहिती दिली.तसेच परिवर्तन केंद्राची संकल्पना विशद केली.यावेळी गुरूवर्य वि.स.खांडेकर विद्या प्रतिष्ठान चे अध्यक्ष चंद्रकांत ओटवणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केला.या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,रेडी जि.प.सदस्य तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, भाजप वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,शिरोडा ग्रामपंचायत सदस्य समृद्धी धानजी,प्राची नाईक,वेदिका शेटये, शिरोडा ग्रामपंचायत माजी सरपंच विजय पडवळ,आरवली ग्रामपंचायत सरपंच तातोबा कुडव,आरवली ग्रामपंचायत सदस्य सायली कुडव,शिरोडा,आरवली,आसोली,रेडी,शक्ती केंद्र प्रमुख विदयाधर धानजी,महादेव नाईक,विजय बागकर,जगन्नाथ राणे,वेंगुर्ले तालुका युवा मोर्चा चिटणीस केशव नवाथे,आरवली भाजप पदाधिकारी नंदू चिपकर,भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी,उपाध्यक्ष संतोष अणसूरकर,सरचिटणीस सुरेश म्हाकले,भाजप शिरोडा शहर महिला आघाडी अध्यक्ष संध्या राणे,भाजप शिरोडा शहर पदाधिकारी चंद्रशेखर गोडकर,अनिल गावडे,हरिश्चंद्र परब,बाळकृष्ण परब,दत्ताराम फटजी,राजेन्द्र भोपाळकर,भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत,प्रभारी मुख्याध्यापक जे.जी.पाटील,सहाय्यक शिक्षक एस्.एल्.कदम,सी.एम्.हरगुडे,आर.पी.आव्हाड,आर.डी.चव्हाण,एन्.व्ही.वालावलकर,शिक्षकेतर कर्मचारी, जी.एस्.येसजी.पी.यादव.लाभार्थी व लाभार्थींचे पालक,ग्रामस्थ,उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन्.व्ही.वालावलकर यांनी केले.

अभिप्राय द्या..