You are currently viewing वैभववाडी (कोकीसरे) नारकरवाडी रेल्वे फाटक नजिकच्या टॅंकर व ट्रकमद्धे अपघात..

वैभववाडी (कोकीसरे) नारकरवाडी रेल्वे फाटक नजिकच्या टॅंकर व ट्रकमद्धे अपघात..

टॅंकर मधिल गुळाची काकवी रस्त्यावर उलटल्याने वैभववाडी रेल्वे फाटक परिसरात वाहतूक खोळंबली..

वैभववाडी /-

आज पहाटेच्या सुमारास कोल्हापूर वरून तरळेच्या दिशेने गुळाची काकवी घेऊन जाणाऱ्या टँकर मधील काकवी रेल्वे फाटक परिसरातील तिव्र वळणाच्या उताराच्या रस्त्यावर सांडली परिणामी रेल्वे गेट परिसरात मोठी वाहाने स्लिप होण्याच्या घटना घडत आहेत एक टेंम्पो रस्त्यालगतच्या झाडास जाऊन टेकला आहे तर लक्झरी बस तिव्र वळणावर उतारावर रस्त्याकडील साईडपट्टीमध्ये फसली आहे. यामुळे रेल्वे फाटक परिसरात दुतर्फा वाहनांच्या एक कि.मी. पर्यंत रांगा लागल्या होत्या परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

सदर घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आपण स्वतः व सहकारी पोलीस कॉन्स्टेबल मारुती साखरे, अभीजीत तावडे, अभीजीत मोरे, गिरीश तळेकर व मंगेश कडू व उपस्थित ग्रामस्थ यांनी रस्ता पाण्याने धुऊन एक तासांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. त्यामुळे प्रवाशांकडून पोलिस प्रशासनाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

अभिप्राय द्या..