दुर्धर आजार मदतीसाठी जिल्हा परिषदेकडून २० प्रस्तावांना मंजुरी.;जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांची माहिती..

दुर्धर आजार मदतीसाठी जिल्हा परिषदेकडून २० प्रस्तावांना मंजुरी.;जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांची माहिती..

सिंधुदुर्गनगरी /-


सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने दुर्धर आजाराने पिडीत रुग्णांना औषध उपचारासाठी हातभार लागावा यासाठी प्रति लाभार्थी १५ हजार रुपये आर्थिक सहाय्य केले जाते. २७ जुलै २०२१ पर्यंत जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे कणकवली तालुक्यातील १, कुडाळ तालुक्यातील २ मालवण तालुक्यातील ५ वेंगुर्ला तालुक्यातील १ सावंतवाडी तालुक्यातील ११ असे पाच तालुक्यातील मिळून दुर्धर आजार मदतीसाठी २० प्रस्ताव प्राप्त होते. हे प्रस्ताव आरोग्य विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने अध्यक्ष जि प सिंधुदुर्ग यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी आले होते. अध्यक्ष संजना सावंत यांनी प्राप्त सर्वच्या सर्व प्रस्तावना मंजुरी दिली. तसेच आरोग्य विभागाकडे अद्यापही २० दुर्धर आजार प्रस्ताव मंजुरीसाठी आलेले असून सर्व पूर्तता तातडीने करून सर्वच्या सर्व प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना देखील अध्यक्ष यांनी आरोग्य विभागाला दिल्या

अभिप्राय द्या..