You are currently viewing शिष्यवृत्तीला परीक्षेला बसणार ४ हजार ९४४ विद्यार्थी

शिष्यवृत्तीला परीक्षेला बसणार ४ हजार ९४४ विद्यार्थी

सिंधुदुर्गनगरी /-

अंतीमता तब्बल तीन वेळा पुढे गेलेली पूर्व प्राथमिक पूर्ण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्ट रोजी होण्याचे निश्चित झाले आहे. सकाळी ११ ते १२.३० या वेळेत प्रथम भाषा आणि गणित तर दुपारी १.३० ते ३ या वेळेत द्वितीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी हे पेपर होणार आहेत. एकूण ७५ प्रश्न असणार असून प्रत्येक पेपर १५० गुणांचा असणार आहे. यातील ४० टक्के गुण मिळविणारा विद्यार्थी पात्र व त्यापेक्षा कमी गुण मिळविणारा विद्यार्थी अपात्र ठरणार आहे. जिल्ह्यात पाचवीसाठी ३ हजार २८० विद्यार्थी तर आठवीसाठी १ हजार ६६४ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. एकूण ४ हजार ९४४ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

अभिप्राय द्या..