आचरा येथील खंडीत बीएसएनएल सेवा सुरू करा.;ग्रा.प.सदस्या अनुष्का गांवकर  यांनी वेधले आ.नाईक यांचे लक्ष

आचरा येथील खंडीत बीएसएनएल सेवा सुरू करा.;ग्रा.प.सदस्या अनुष्का गांवकर यांनी वेधले आ.नाईक यांचे लक्ष

आचरा /-
वारंवार खंडित होणाऱ्या बीएसएनएल सेवेचा फटका आचरा वासियांना बसत असून सेवा तातडीने सुरळीत करण्यासाठी आचरा ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गांवकर यांनी मालवण येथे आलेल्या आमदार नाईक यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
या निवेदनात त्यांनी बीएसएनएल ची मोबाईल आणि नेट सेवा कोलमडल्यामुळे यासेवेपासून आचरा वासियांना वंचित रहावे लागत आहे.आचरा हिर्लेवाडी येथे कुठल्याही टाँवरचे नेटवर्क नसल्याने या भागातील मुलांना आँनलाईन अभ्यासासाठी डोंगर भागात हिंडून नेटवर्क शोधावे लागत आहे. यामुळे जंगली श्वापदापासून त्यांच्या जिवाला धोका निर्माण होवू शकतो. यासाठी तातडीने बीएसएनएल सेवा सुरळीत करण्यासाठी आपल्या स्तरावरुन पाठपुरावा करावा अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

अभिप्राय द्या..