महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली झेमणे याना पोलीस नाईक पदी पदोन्नती..

महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली झेमणे याना पोलीस नाईक पदी पदोन्नती..

देवगड /-

देवगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली मनोहर झेमणे याना पोलीस नाईक पदी पदोन्नती देण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील सुमारे ३६ पोलीस कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आली आहे त्या सर्वांचे जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी अभिनंदन. करून शुभेच्छा दिल्या आहेत .यात प्रणाली झेमणे यांचा समावेश आहे. प्रणाली झेमणे या मूळ ओसर गावच्या असून २०११ साली पोलीस भरतीत त्यांची निवड झाली त्यानंतर दोन वर्ष प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर त्या देवगड पोलीस स्थानकात १नोव्हेंबर २०१३ रोजी महिला पोलीस कॉन्स्टेबल पदी रुजू झाल्या .सुमारे सात वर्षांहून अधिक काळ पोलीस सेवेत असताना देवगड पोलीस स्थानकात सर्व विभागात अभ्यासू वृत्तीने त्यानी सेवा बजावली व अधिकारी वर्गाची शाबासकी मिळविली त्यांच्या पदोन्नती बद्दल देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक एफ.बी.मेंगडे तसेच सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..