राज्यमंत्री सतेज पाटील यांची अतिवृष्टी व पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर करुळ व भुईबावडा घाटाची पाहाणी..

राज्यमंत्री सतेज पाटील यांची अतिवृष्टी व पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर करुळ व भुईबावडा घाटाची पाहाणी..

वैभववाडी /-

कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज गगनबावडा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सतेज पाटील गगनबावडा परिसरात दाखल झाले यावेळी, करूळ घाट व भुईबावडा घाटाची राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडून घाट मार्गाची व परिसरातील पाहणी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे घाटातील दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. तसेच, घाट रस्ता खचल्यामुळे भुईबावडा घाटातून तळ कोकणाकडे जाणारी वाहतूक सतत बंद होत आहे. या पार्श्वभूमीवर घाटातील रस्त्याच्या बाजूने सुरक्षा कठडे काँक्रीटीकरण करण्याबरोबरच रस्ते काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी राज्यमंत्री व कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

यावेळी, करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार संगमेश कोडे, डी वाय पाटील साखर कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, सभापती संगीता पाटील, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय काटकर, आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..