कुडाळ मध्ये सोमवार दिनांक ०९ ऑगस्ट रोजी जमियत उलेमा ए हिंद आयोजीत ‘रक्तदान’ शिबीर..

कुडाळ मध्ये सोमवार दिनांक ०९ ऑगस्ट रोजी जमियत उलेमा ए हिंद आयोजीत ‘रक्तदान’ शिबीर..

कुडाळ /-

‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन जमियत उलेमा ए हिंद, सिंधुदुर्ग द्वारे सोमवारी, ९ ऑगस्टला महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभुमीवर रक्तपेढीमध्ये रक्ताची सतत आवश्यकता असल्याने जमियत उलेमा ए हिंद, सिंधुदुर्ग द्वारे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन सातत्याने केले जात असुन यापुढे देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे नियोजन जिल्हाध्यक्ष मौ. अब्दुल सत्तार बगदादी, सचीव हाफीझ झैद यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे, अशी माहीती श्री. एजाज नाईक यांनी दिली.

जगावर कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. या कठीण काळाचे महत्त्व लक्षात घेऊन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी संपूर्ण जगावर घोंघावत असलेल्या कोरोनारूपी संकटामुळे या रक्तदान शिबिरांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. या उपक्रमास सोमवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता प्रारंभ होईल. वाचकांनी त्यांच्या संपर्कातील रक्तदात्यांना या उपक्रमासंदर्भात माहिती द्यावी. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी ९८९०८००४६०, ८०८७८६५७४६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांद्वारे केले गेले आहे.

अभिप्राय द्या..