You are currently viewing सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांची उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती.

सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांची उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती.

कणकवली /-

कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुजित प्रकाश जाधव यांची उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत कणकवली, देवगड, वैभववाडी या 3 तालुक्यांसाठी शासनस्तरावर उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. या कमिटीवर डीवायएसपी, कणकवली, वैभववाडी, देवगड तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, 1 जि. प. सदस्य, 1 पं स सदस्य व नाना ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कमिटीची बैठक 10 ऑगस्ट रोजी कणकवली उपविभागीय कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या विद्यमान जिल्हाध्यक्षपदी कार्यरत असलेले सुजित जाधव हे विविध सामाजिक संघटनांवर कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा