You are currently viewing वडाचापाट ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाची आ.वैभव नाईक यांनी जि.प. व पं.स.अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी..

वडाचापाट ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामाची आ.वैभव नाईक यांनी जि.प. व पं.स.अधिकाऱ्यांसमवेत केली पाहणी..

इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या जिल्हा परिषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी, व बांधकाम च्या कार्यकारी अभियंत्या यांना सूचना..

मालवण /-

जिल्हा वार्षिक योजनेच्या जनसुविधा योजनेअंतर्गत वडाचापाट ग्रामपंचायत इमारतीसाठी आ. वैभव नाईक यांनी १५ लाख रु निधी मंजूर केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी आज या कामाची जिल्हा परिषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) दीपाली पाटील, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रवींद्र जाधव यांच्यासमवेत पाहणी केली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेत काम दर्जेदार व लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना उपस्थित जिल्हा परिषद बांधकाम च्या अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हा परिषद उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) दीपाली पाटील यांनी लवकरात लवकर दर्जेदार ग्रामपंचायत इमारत उभारण्याच्या सूचना यावेळी जिल्हा परिषद बांधकाम च्या अधिकारी यांना दिल्या. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिक जाधव यांनी शाखा अभियंता यांना सदर कामाची आखणी करून अंदाजपत्रका प्रमाणे काम मुदतीमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना सदर ठेकेदारास दिली व कामाच्या दर्जाची पाहणी केली. तसेच मालवण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी सदर इमारतीचे काम योग्यरीत्या चालू असल्याने पुढील काम देखील अंदाजपत्रका प्रमाणे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सरपंच नमिता कासले, उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर, ग्रा. प. सदस्य अनंत पाटकर, जि. प. बांधकाम उपविभाग मालवणचे उपअभियंता श्री कात्रे, ग्रामसेवक श्री. गर्कल, लक्ष्मण पालव, दिलीप प्रभुदेसाई, प्रमोद पाटकर, राजकुमार हडकर, उमेश मुणगेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा