वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालयात निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न..

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालयात निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न..

मालवण /-

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालय कट्टा तील सहायक शिक्षक श्री. प्रकाश भिकाजी कदम यांची नियत वयोमानानुसार काल सेवानिवृत्ती झाली. या निमित्ताने वराडकर हायस्कूल कट्टा च्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती श्री कदम पी बी तसेच सौ. पुष्पांजली कदम यांचा शाळेच्या वतीने श्रीफळ व शाल तसेच खणा नारळाची ओटी देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी हिंदी विभागाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच प्रशालेच्या हिंदी विभागाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी कट्टा पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव श्रीमती विजयश्री देसाई, सचिव सुनिलजी नाईक, स्कूल कमिटी अध्यक्ष श्री सुधीर वराडकर, मुख्याध्यापक श्री. एन. के. कांबळे ज्येष्ठ शिक्षक श्री एस. एस. नाईक व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी बोलताना मान्यवरांनी सत्कार मूर्ती कदम सर यांच्या विषयी आपली मनोगते व्यक्त केली.

श्री सुनिलजी नाईक सचिव क.पं.शि.प्र.मंडळ कट्टा

कट्टा पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळाला एक वेगळा इतिहास असून या ठिकाणी ज्यां शिक्षकांनी अध्यापनातून शारदेची सेवा केली आहे. अश्या शिक्षकांच्या बाबतीत संस्था नेहमीच आग्रही आहे. असे शिक्षक संस्थेला लाभले हे आमचे भाग्य असून या शिक्षकांच्या प्रत्येक कार्यात प्रोत्साहन देण्याचे कार्य नेहमीच आपण करत आलो आहोत. कदम सर यांच्या सारख्या गुणी शिक्षकांच्या मुळे आम्ही एक समाजाचे प्रतिक बनलो आहोत आणि अश्या शिक्षकांचा आम्हाला कायम अभिमान राहीला आहे. सरांचे कार्य आणि

त्यांनी दिलेले योगदान याबददल आम्ही आपले कायम ऋणी राहू असे गौरवोदगार संस्थेचे सचिव श्री. सुनिलजी नाईक यांनी काढताना संस्थेचे माजी अध्यक्ष, सचिव, संचालक, खजिनदार यांची संस्थेला लाभलेली मूल्यांची देणगी आणि त्यामुळे होणारा संस्थेचा विकास याबददल सर्वाना परिचित केले.

एक सहकारी एक कौटुंबिक नाते असणारी आपली शाळा असून जिल्हयातील नामांकित म्हणून संस्थेचा शाळेचा उत्कर्ष झाला आहे. शाळेमध्ये येणारी सहकारी व्यक्ति ही आपली कधी होऊन जाते हे कळत नाही. मग ते विदयार्थी शिक्षक व सहकारी ही असू शकतात. आपण आपल्या आयुष्यात नाते जपताना सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे सत्कार मुर्ती श्री कदम सर यांच्या उल्लेखनीय कार्याब्ददल बोलताना एक सहकारी म्हणून आलेले अनुभव संस्थेच्या सचिव श्रीमती देसाई यांनी व्यक्त केले व भावी वाटचालीबददल शुभेच्छा दिल्या.

श्री नाईक एस एस कदम सर एक अजातशत्रू एक सरळ व्यक्तिमत्व असून एखादया ऑल राऊंडर प्रमाणे सर्व विषय घेऊन सर्व मुलांचे लाडके बनले. स्काऊट गाईड शारीरिक शिक्षण हिंदी विषय या प्रमाणे गणित विषयाच्या अध्यापन व स्पर्धा परीक्षांमध्ये सरांचा सहभाग हा एक सर्वांना प्रेरणा देणारा होता. शैक्षणिक सहली सारखे उपक्रमातून मिळणारा प्रत्यक्ष अनुभव व अध्यापन सरांच्या उपक्रमातील भाग होता सरांच्या या सर्व गुण वैशिष्टयामुळे आपल्याला ही बरेच काय शिकता आले असे शिक्षक लाभणे हे खरोखरच भाग्य असून एक सहकारी म्हणून त्यांचे व्यक्तित्वगत्व आदरास पात्र आहे. असे उदगार ज्येष्ठ शिक्षक श्री नाईक एस एस यांनी काढले

मुख्याध्यापक: स्काऊट गाईड हा नेहमी तैयार असतो सर आणि त्यांचे कार्य हे एक अप्रतिम समीकरण होत एक सहकारी म्हणून मी ही त्यांच्याबरोबर कार्य केले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय म्हणजे त्यांचे कार्य हिंदी विषयातील त्यांचे योगदान महत्वाचे असून गणित शारिरीक शिक्षण शैक्षणिक सहली या सारख्या उपक्रमातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्याचे कार्य सरांनी सहजगत्या जमले असे शिक्षक लाभणे हे सुदधा भाग्य लागते असे गौरवोदगार सरांनी काढले

श्री. बी. एम. वाजंत्री हिंदी प्रमुखः कदम सर हे नाव आज वराडकर हायस्कूल च्या इतिहासात मानाने घेतले जाणार आहे. कदम सर यांनी आजपर्यंत सर्व विषय घेतले . हिंदी विषया संदर्भात त्यांचे योगदान मोठे असून एक मोठा काळ त्यांना यासाठी मिळाला यामुळे हिंदी उपक्रमातील परीक्षा व स्पर्धा या माध्यमातून अनेक विदयार्थ्यांना सरांनी हिंदीमय केले. सरांचे व्यक्तिमत्व हे हिंदी भाषेप्रमाणे सर्वांना सामावून घेण्याचे असल्यामुळे सर्व सदस्यांना भाषेच्या या प्रवाहात घेऊन कार्य केले. आज हिंदी म्हटलं की कदम सर हे नाव सर्वाना माहित होत. एक आधार देणारे व्यक्तिमत्व कदम सर यांच्या सहकार्याने काम करण्याची संधी मिळाली याचे खारे मानकरी कदम सर आहेत असे उदगार हिंदी प्रमुख श्री. बी. एम. वाजंत्री यांनी काढले.

सौ. डी. डी. गावडे: सत्कारमूर्ती कदम सर यांचे व्यक्तिमत्व म्हणजे एक आधार म्हणावाच लागेल . कोणत्याही कार्याला सकारात्मकता सहकार्य करण्याची त्यांची प्रवृत्ती आणि त्याचबरोबर समजून सांगण्याची असणारी कला अशी माणसे आज आढळतात त्यापैकी एक माझ्या पहाण्यातील व सहकारी म्हणून अनुभवलेले व्यक्तिमत्व स्काऊट गाईड च्या निमित्ताने घेण्यात येणा या उपक्रमातून अन्य . विषयांच्या परीक्षा स्पर्धा परीक्षांच्या या मधील सरांचा उत्साह एक प्रेरणा देणारा होता एक पितृतूल्य . व्यक्तिमत्व आज आपल्या मधून निरोप घेत असून याचेदुख पण आहे. पण त्याच बरोबर आनंद ही आहे. की सरांचा काळ हा खरोखरच चांगला सहवासात गेला असे आपले विचार मांडताना सरांना आयुष्यास सुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन श्री पेंडुरकर एस ए आभार प्रदर्शनः सौ. गावडे डी. डी यांनी केलं.

अभिप्राय द्या..