मसुरे /-

मानवसेवा विकास फाऊंडेशन, साप्ताहिक ग्रामवैभव तसेच इंटर नॅशनल ह्युमन रिसर्च सेंटर, अमरावती या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्थेतर्फे देण्यात येणारा ” स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय पुरस्कार-२०२० ” साठी गेली अर्धशतक क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात तळागाळातील लोकांत निस्वार्थपणे योगदान देणारे सिंधुदुर्ग जिल्हातील दाभोली वेंगुर्ल्याचे श्री. अशोक गणेश दाभोलकर-मेस्री ह्यांची निवड झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून कामगिरी केलेले अशोक दाभोलकर गेली सहा वर्षे सिंघुदुर्ग जिल्हातील जि. प, शाळांमधून क्रिडा विषयक चर्चासत्र, व्हाॅलीबाॅल शिबिर तसेच विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनात सक्रीय आहेत.
ह्या पुरस्काराबद्दल त्यांचे वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, उद्योजक श्रीकृष्ण परब, जेष्ठ खेळाडू राजेन्द्र सावंत, वनअधिकारी संजय कदम, सुरेन्द्र सकपाळ, दत्तप्रसाद पेडणेकर यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page