वेंगुर्ला /-


सध्याची पर्यावरणाची बदलती परिस्थिती वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करीत आहे.पंतप्रधान ग्राम सडकच्या पलतड मातोंड रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभाग, पंचायत समिती वेंगुर्ले आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने काजू रोपांची लागवड करण्यात आली.
सदर वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ पं.स. सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी तुळस सरपंच शंकर घारे,मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक सगुण नाईक, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल वेंगुर्लाचे अनिरुद्ध ढगे, वनरक्षक श्रेया परब, वनमजूर बापू डोईफोडे , तांत्रिक सहाय्यक (कृषी) सुप्रिया सावंत, गटसमन्वयक द्रौपदी नाईक,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (रोहयो) विवेक तिरोडकर, रजनी सावंत, प्रतिष्ठान सचिव प्रा.सचिन परुळकर, उपाध्यक्ष नाना राऊळ व प्रदीप परुळकर, समिर राऊळ, मंगेश सावंत, सुधीर चुडजी, प्रा. एम. बी. चौगले, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतिम वर्ष प्रशिक्षणार्थी भूमिका चौगले,सचिन नाईक आदी उपस्थित होते.आज अनेक नैसर्गिक संकट मानव जातीवर येत असून वृक्षारोपण सारख्या शासनाच्या उपक्रमात सहभागी होत श्रमदानातून समाजपयोगी उपक्रम प्रतिष्ठान सतत राबवित आहे. इतर संस्थानी सुद्धा प्रतिष्ठान चा आदर्श घेऊन सातत्याने उपक्रम राबवावेत असे प्रतिपादन पं.स.सभापती अनुश्री कांबळी यांनी केले. तसेच प्रतिष्ठानने यापूर्वी मुंबई-गोवा महामार्गच्या दुतर्फा वृक्षारोपण व नदी किनारा धूप रोखण्यासाठी केलेल्या कांदळ प्रजाती वृक्षारोपण करत पर्यावरण पूरक उपक्रम सातत्याने राबवत असल्या बाबत कौतुक केले.


सामाजिक वनीकरण वेंगुर्ला चे वनक्षेत्रपाल अनिरुद्ध ढगे यांनी वृक्षरोपण उपक्रम राबविण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. तसेच अशा उपक्रमांना शासनास लोकसहभागाच्या सहकार्याची आवश्यकता असते. त्यासाठी वेताळ प्रतिष्ठान स्वेच्छेने पुढे येऊन उपक्रमात सक्रिय सहभाग घेत वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी केल्याबाबत आभार व्यक्त केले.वृक्षारोपण कार्यक्रमासाठी किरण राऊळ, रोहन राऊळ, प्रशांत सावंत, अक्षता गावडे, कुंदा सावंत,रोहन राऊळ, हेमलता राऊळ, किरण राऊळ, प्रविण राऊळ, प्रविण परब, सागर सावंत, सानिया वराडकर, अमित तांबोसकर, प्रमोद तांबोसकर आदींनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page