आशिये,वरवडे पूरग्रस्तांना शासनाकडून मदत…

आशिये,वरवडे पूरग्रस्तांना शासनाकडून मदत…
कणकवली /-

कणकवली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी घुसून नुकसान झाले. त्या पूरग्रस्त कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून धान्य वाटप केले जात आहे. तहसीलदार रमेश पवार यांच्या सूचनेनुसार आशिये गावातील पूरग्रस्तांना आज रास्त धान्य दुकान येथे माजी उपसभापती महेश गुरव यांच्या हस्ते सुनिल पुजारे यांना धान्य वाटप करण्यात आले. आशिये गावात एका कुटुंबाला १० किलो गहू, १० किलो तांदूळ असे धान्य वाटप करण्यात आले. यावेळी आशिये उपसरपंच संदीप जाधव, तलाठी निलिमा सावंत, ग्रामसेवक राकेश गोळवणकर, कोतवाल गणपत तेली, बाळकृष्ण गुरव आदी ग्रामस्थ उपस्थित होते. त्याचप्रमाणे वरवडे गावातील १३ कुटुंबातील लोकांना प्रत्येकी १० किलो गहू, १० किलो तांदूळ असे धान्य वाटप करण्यात आले. रॉकेल व डाळ शासनाकडून प्राप्त झाल्यावर वाटप करण्यात येणार असल्याने तलाठी निलिमा सावंत यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..