शिवसेना बांदा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर…

शिवसेना बांदा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर…

सावंतवाडी /-

शिवसेना बांदा विभागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या आहेत. यामध्ये तांबोळी पंचायत समिती उपविभाग प्रमुख पदी सुहास सावंत, डिंगणे युवासेना शाखा अधिकारी पदी सागर डिंगणेकर, डोंगरपाल महिला आघाडी शाखा संघटक पदी लक्ष्मी नाईक तर विभागीय संघटक पदी प्रवीण नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत त्यांना आज नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..