You are currently viewing सावंतवाडी मुंताजीमा कमिटी कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने पूरग्रस्तांना मदत..

सावंतवाडी मुंताजीमा कमिटी कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने पूरग्रस्तांना मदत..

सावंतवाडी /-

सावंतवाडी शहरातील मुस्लिम बांधवांनी पुन्हा एकदा तालुक्यातील पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे. शहरातील मुंताजिमा कमिटी कब्रस्तान ट्रस्ट सावंतवाडीच्या वतीने आज तालुक्यातील माडखोल, धवडकी, विलवडे, सरमळे, ओटवणे या ग्रामीण भागातील पूर ग्रस्त 120 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी आज दोन छोट्या टेम्पो मधून मार्गस्थ झाले आहेत.

यापूर्वी शहरातील मुस्लिम हेल्थ अँड वेल्फेअर फाऊंडेशन च्या माध्यमातून देखील 108 कुटुंबांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर येऊन त्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, ते अजूनही पूर्वपदावर आले नाही आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाने पुन्हा एकदा एकत्र येत त्या भागातील नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.

यावेळी कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष तौकिर शेख, उपाध्यक्ष मुझिब शेख, यांच्या पुढाकारातून हे मदतकार्य करण्यात येत आहे. यासाठी सेक्रेटरी परवेझ बेग, खजिनदार शोहेब बेग, कायदेशीर सल्लागार हिदायतुल्ला खान, सदस्य बासित पडवेकर, अन्वर शहा, बाबासाहब दर्गावाले, इरफान शेख, शोहेब गनी, जुबेर पडवेकर यांनी खुप मेहनत घेतली आहे.

अभिप्राय द्या..