राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धुरीवाडी वासियांना लाईफ जॕकेट प्रदान..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धुरीवाडी वासियांना लाईफ जॕकेट प्रदान..

सावंतवाडी /-

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे इन्सुली भागाला देखील मोठा फटका बसला असून येथील धुरीवाडी भागात मोठे नुकसान झाले आहे. येथील स्थानिक ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून येथील ग्रामस्थांना लाइफ जॅकेट प्रदान करण्यात आले. तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या माध्यमातून अजून मदत पुरवली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, इफ्तिकार राजगुरू, संतोष संजय पालो, सुभाष तावडे, औदुंबर पालो, उमेश पेडणेकर, सूर्या पालव, दादा पालव, सुनील सावंत, प्रीतेश पालव, लक्ष्मण नाईक, अंकुश नाईक, आशीर्वाद पालव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..