मिठबांव कबीरनगर येथील तरूण मंडळ, महिला मंडळातर्फे पोसरे दुर्घटनाग्रस्तांना मदत…

मिठबांव कबीरनगर येथील तरूण मंडळ, महिला मंडळातर्फे पोसरे दुर्घटनाग्रस्तांना मदत…

कणकवली /-

देवगड तालुक्यातील मिठबांव कबीरनगर (बौद्धवाडी) येथील तरूण मंडळ,महिला मंडळ व कबीरनगरवासीयांच्यावतीने खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनाग्रस्तांना एक लाख पन्नास हजार रूपयांची विविध स्वरूपात मदत करण्यात आली. यामध्ये विविध प्रकारची भांडी,तांदुळ, तेल व विविध अन्य जीवनावश्यक वस्तू , तसेच महिलांसाठी साड्या,मुलांसाठी विविध कपडे.(90,000) विनय मोहिते, विराज मोहिते, सुजल मोहिते, राणी मोहिते या अनाथ झालेल्या मुलांच्या नावे प्रत्येकी 10,000/- एफडी स्वरूपात (40,000),पोसरे बौद्धवाडीतील सामाजिक कार्यकर्ते शाम मोहिते, सुरज मोहिते, सुजल मोहिते याच्याकडे औषधोपचारासाठी रोख रक्कम 22,000/- सुपुर्द करण्यात आली. यावेळी शरदचंद्र शैलेश मिठबावकर, श्याम कदम , मंदार ढोके, राजेद्र मिठबावकर,संजय मिठबावकर,जयवंत मिठबावकर, विक्रांत मिठबावकर, अतुल मिठबावकर आदि उपस्थित होते.

अभिप्राय द्या..