देवगड पवनचक्कीसमोर समुद्रात महाकाय जहाज दाखल नागरिकांनमद्धे घबराट

देवगड पवनचक्कीसमोर समुद्रात महाकाय जहाज दाखल नागरिकांनमद्धे घबराट

देवगड /-

देवगड पवनचक्कीसमोर समुद्रात गुरूवारी सकाळी एक महाकाय जहाज नागरिकांना दिसले.वादळी वातावरण व सध्या सुरू असलेल्या मुसळधार पाऊस अशा स्थितीत पवनचक्कीसमोर संशयास्पद महाकाय जहाज दिसल्याने सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली. या जहाजाबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले. देवगड पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे व पोलिस कर्मचारी यांनी प्रत्यक्ष जावून पाहणी करून जहाजाबाबत माहिती घेतली.यावेळी हे जहाज प्रवाशी जहाज असून ते इंडोनेशिया या देशातून गुजरात येथे दुरुस्तीसाठी जात असल्याचे निष्पन्न झाले. वल्ड नावाचे जहाज असून इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे हे जहाज देवगड पवनचक्कीसमोर समुद्रात थांबले आहे. जहाजामध्ये प्रवाशी नसून फक्त कर्मचारी आहेत. जहाजावरील कर्मचाèयांनी त्यांचा यंत्रणेशी संपर्क साधला असून ती यंत्रणा जहाज दुरूस्त करून अथवा पर्यायी व्यवस्था करून जहाज घेवून जाणार आहे. या जहाजामध्ये संशयास्पद काहीही नसल्याचे पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी माहिती दिली.

यापुर्वीही देवगड समुद्रात अलमुर्तदा जहाज बंद अवस्थेत आढळल्यामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली होती. त्यानंतर जुन २०१० मध्ये देवगड तांबळडेग समुद्रकिनाèयासमोर खोल समुद्रात संशयास्पद जहाज आढळल्याने खळबळ उडाली होती.

अभिप्राय द्या..