कणकवली तालुक्यातील अनेक भागात घरावर कोसळली झाडे..

कणकवली तालुक्यातील अनेक भागात घरावर कोसळली झाडे..

कणकवली /-

कणकवली तालुक्यात कालपासून ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे पडझड झाल्याच्या घटनाही घडत आहेत. कणकवली शहरात देखील वादळी वाऱ्यामुळे घरावर झाड पडून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. शहरातील हर्णे आळी भागात संतोष ठाणेकर यांच्या घरावर झाड कोसळून त्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायतचे पथक झाड हटवण्यासाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून नगरपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

अभिप्राय द्या..