माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला..

माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला..

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला पूर आल्याने तब्बल २७ गावांचा संपर्क तुटला आहे. परिसरातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.

गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढतच आहे. त्यामुळे माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याने तब्बल २७ गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर भात शेती सुद्धा पाण्याखाली गेली आहे. पावसाचा जोर अजून कायम राहिल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..