नांदगावात पुरस्थिती निर्माण मुख्य मार्ग झाला बंद..

नांदगावात पुरस्थिती निर्माण मुख्य मार्ग झाला बंद..

कणकवली /-

गेले आठवडाभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नांदगाव परिसरात नदिचे पाणी शिरल्याने बराच भाग पाण्याखाली गेला आहे. नांदगाव ओटव रस्त्यावरुन नदीचे पाणी वाहू लागल्याने नांदगाव ओटव संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे. नांदगाव कुंभार वाडी, पाठवणेवाडी, वाघाचीवाडी तसेच मधली वाडी अशा ठिकाणी पाणी आल्याने मुख्य मार्ग बंद झाला आहे. तसेच अंतर्गत काही रस्तेही बंद झाले आहेत. यात नांदगाव मधली वाडी येथील बाबा गगनग्रास ठिकाणापर्यंत जाणारा रस्ताही पाण्याखाली गेल्यामुळे बंद झाला आहे. तसेच नांदगाव पावाची वाडी येथील नदीचे पाणी ब्रिज वरुन वाहत असल्याने या वाडीचाही संपर्क पुन्हा एकदा तुटला आहे.

अभिप्राय द्या..