मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत.;नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला..

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत.;नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला..

सिंधुदुर्ग /-

गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदिचे पाणी पात्राबाहेर रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी महामार्गावर झाडांची पडझड झालेली देखील पहायला मिळत आहे.आज सकाळपासूनच जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.जिल्ह्यातील नद्यांची पात्रे तुडुंब भरून वाहत असुन नदीकाठच्या शेतीमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.एकंदरीत ही पुरस्थिती लक्षात घेता जनजीवन विस्कळित झाल्याचे पहावयास मिळते आहे.

अभिप्राय द्या..