You are currently viewing कसाल हिवाळे -राठीवडे खड्डेमय रस्त्याची शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबा सावंत स्वखर्चाने दुरुस्ती करणार..

कसाल हिवाळे -राठीवडे खड्डेमय रस्त्याची शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबा सावंत स्वखर्चाने दुरुस्ती करणार..


कणकवली /-

 मोठया प्रमाणात वाहतूक सुरू असलेला आणि वाहनधारकांसाठी सोयीचा असलेल्या कसाल हिवाळे -राठीवडे हा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालकांना व नागरिकांना वाहन चालवणे किंवा पायी चालणे मुश्किल झाले आहे. रस्त्याची चाळण झाली आहे याबाबत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रशांत उर्फ बाबा सावंत यांनी दखल घेऊन, रस्ता जनतेचा आहे, या एकाच जाणीवेने प्रत्यक्ष पहाणी करून रस्ता दुरुस्तीसाठी शनिवार २४ जुलै रोजी स्वखर्चाने दुरुस्ती करणार असल्याचे बाबा सावंत यांनी जाहिर केले आहे.
यावेळी आडवली मालडी विभागातील मुख्य शिवसैनिक उपस्थित राहून या रस्त्याची डागडुजी करणार आहेत. हिवाळे गणपती मंदिर येथे वळणावर मोठा खड्डा पडल्याने वाहने चालवणे व शेतकऱ्यांना जनावरे घेऊन जाणे येणे एवढे धोक्याचा झालेला असल्याने या मार्गाची दुरुस्ती व्हावी म्हणून नागरिकांची मागणी होती. परंतू नागरिकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने आजपर्यंत दखल न घेतल्याने शिवसेनेचे मालवण उपतालुकाप्रमुख बाबा सावंत यांनी त्या ठिकाणी जाऊन रस्त्याची स्वखर्चाने दुरुस्ती करणार आहेत अशी माहिती दिली आहे.

अभिप्राय द्या..