You are currently viewing भाजप ओबीसी मोर्चाच्या मुंबई महामंत्रीपदी गुरुनाथ मिठबावकर

भाजप ओबीसी मोर्चाच्या मुंबई महामंत्रीपदी गुरुनाथ मिठबावकर

मालवण /-

भाजप ओबीसी मोर्चाच्या मुंबई महामंत्रीपदी गुरुनाथ मिठबावकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या आदेशावरून आमदार व मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांनी ही नेमणूक केली आहे. या नेमणुकीबद्दल आम. अतुल भातखळकर यांनी गुरुनाथ मिठबावकर यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजप ओबीसी मोर्चा मुंबई अध्यक्ष नरेन गावकर उपस्थित होते. आमदार आशिष शेलार, खासदार ओबीसी राष्ट्रीय सरचिटणीस संगमलाल गुप्ता यांनीही मिठबावकर यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, गुरुनाथ मिठबावकर यांच्या बरोबरच प्रकाश चौधरी, मनोज जयस्वाल यांची महामंत्री म्हणून तर रवि करमरकर याची मुंबई उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..