साहस प्रतिष्ठान, सिधुदुर्ग संस्थेचा वर्धापनदिन साजरा..

साहस प्रतिष्ठान, सिधुदुर्ग संस्थेचा वर्धापनदिन साजरा..

वेंगुर्ला /-

साहस प्रतिष्ठान, सिधुदुर्ग या संस्थेच्या चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिव्यांग बंधू-भगिनिचा नविन ‘शौर्य दिव्यांग बचत गटाची‘ स्थापना करण्यात आली. साहस प्रतिष्ठान, सिधुदुर्ग या संस्थेचा चौथा वर्धापनदिन संस्थेच्या कार्यालयात अध्यक्षा रुपाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. दिव्यांग बंधू-भगिनींचा नविन शौर्य दिव्यांग बचतगटाची स्थापना करण्यात आली. यावेळी संस्थेचे विश्वस्त ज्योती मडकईकर, नगरपरिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुंबरे व समुदाय संघटक अतुल अडसुळ आदी उपस्थित होते. नविन स्थापन करण्यात आलेला शौर्य दिव्यांग बचत गट हा राष्ट्रीय व राज्य नागरी उपजीविका अभियान अंतर्गत नगरपरिषद वेंगुर्ल्यास जोडण्यात आल्याची माहिती रुपाली पाटील यांनी देत, ‘दिव्यांग बंधू-भगिनींचा सर्वांगीण विकास न्या व हक्क यासाठी कटिबद्ध‘ हे ब्रिदवाक्य उराशी बाळगून सतत कार्यरत असणारी ही संस्था, हितचितकांच्या व देणगी दात्यांच्या सहकार्याने अविरत सुरु असल्याचे सांगितले.

अभिप्राय द्या..