मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मृती आपण जपुया..

मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मृती आपण जपुया..

सिंधूभूमी कला अकादमी आणि आमदार प्रमोद जठार मित्र मडळातर्फे शोकसभा..

कणकवली /-

शब्दांची श्रीमंती असलेला या संवेदनशील मनाच्या कवीचा सहवास आम्हाला लाभला. आपल्या परिसरात साहित्यिक, कलावंत असेल तर किमान त्याची विचारपुस झाली पाहिजे. आणि जे लक्ष्मीपुत्र आहेत त्यांनी एकतरी साहित्यिक सोबत घेता येईल का? यावर विचार केला पाहिजे. नानिवडेकर यांच्या स्मृती आपण जपुया, असे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी कासार्डे येथे केले. सिंधूभूमी कला अकादमी आणि आमदार प्रमोद जठार मित्र मडळाने आयोजित केलेल्या गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या शोकसभेत बोलत होते.  यावेळी कणकवली तहसीलदार यांच्या हस्ते गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, कणकवली उपसभापती प्रकाश पारकर, कासार्डे माजी सरपंच संतोष पारकर, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, डामरे माजी सरपंच बबलु सावंत, रवींद्र शेटये, संजय नकाशे, भाई मोरजकर, दिगंबर केसरकर, श्रीपत पाताडे, कवी डॉ. अनिल कांबळी, लेखक प्रमोद कोयंडे, प्रसाद जाधव, उद्योजक प्रविण पोकळे यांच्यासह दशक्रोशीतील नानिवडेकर प्रेमी उपस्थीत होते.  नानिवडेकर यांचा आपल्या सर्वांना दीर्घकाळ सहवास लाभला. आपल्या सर्वांचे त्यांच्याशी जवळचे नाते निर्माण झाले होते. त्यांची कायम स्मृती जागृत रहावी यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करुया. सिन्धुभुमी कला अकादमीची स्थापनाच नानिवडेकर यांच्यामुळे झाली. त्यामुळे या माध्यमातून त्यांचे साहित्यिक काम उभारुया. असे मत प्रमोद जठार यांनी व्यक्त केले. तर स्वच्छ मनाचा आणि संवेदनशील असलेल्या नानिवडेकर यांचे सबंध सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी होते. त्यांच्या मृदू स्वभाव आणि गोड कवितेमुळे अनेकांशी त्यांचे नाते घट्ट झाले, असे मत तहसीलदार आर. जे. पवार यांनी व्यक्त केले. यावेळी प्रकाश पारकर, डॉ. अनिल धाकू कांबळी, प्रमोद कोयंडे यांनी नानिवडेकर यांच्या आठवणी जागृत केल्या.  यावेळी सिंधुभूमी कला अकादमीच्या माध्यमातून नानिवडेकर यांची स्मृती कायम रहावी यासाठी कासार्डे येथे एकत्रित काम करण्याचे ठरले. प्राथमिक टप्प्यात एवढ्या मोठ्या गझलकाराचा एकमेव काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून त्यांचे साहित्य एकत्रित करुन त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचे ठरले. यावेळी सतिश मदभावे, सदाशिव पांचाळ, संजय खानविलकर, गुरुप्रसाद सावंत, सचिन राणे, निकेत पावसकर आदी उपस्थीत होते.

अभिप्राय द्या..