You are currently viewing अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू.;वैभववाडी तालुक्यातील सोनाळी (कुंभारी) मार्गावर घडली घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू.;वैभववाडी तालुक्यातील सोनाळी (कुंभारी) मार्गावर घडली घटना

वैभववाडी /-

वैभववाडी तालुक्यातील सोनाळी ( कुंभारी) या मार्गावर अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने त्याच्या नाकातोंडातून रक्तस्राव होऊन बिबट्याचा जागीच मृत्यु झाला आहे. या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेचे वृत्त समजताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

यावेळी कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर, वनपाल सदाशिव वागरे, वनरक्षक उत्तम कांबळे, वनरक्षक किरण पाटील, वनमजूर मराठे, पाताडे घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंबी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अभिप्राय द्या..