कुडाळ /-

कुडाळ शहराला अनेक वर्षापासून सुविधांपासून का वंचित ठेवण्यात आले. ग्रामसभेमध्ये मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी कुडाळ शहरातील नागरीक प्रयत्न करीत होते. त्यावेळी ग्रामसभेमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक एकच उत्तर देत होते. आम्हांला ते अधिकार नाहीत व फंड नाही. त्यानंतर कुडाळच्या नागरीकांनी नगरपंचायत झाल्यावर त्या सुविधा कुडाळला उपलब्ध होतील या दृष्टीकोणातून नगरपंचायत करण्यात आली. नगरपंचायत झाल्यानंतर कुडाळ हायस्कूल ते आंबेडकर पुतळा या रस्त्याचे रुंदिकरण करून सुशोभिकरण होणे आवश्यक होते, ट्राफिकच्या अडचणी सोडविण्यासाठी भाजी विक्रेत्यांसाठी सुसज्ज भाजी मार्केट उपलब्ध करुन देणे गरजेचे होते, मच्छीमार्केटचे दोनवेळा भूमिपूजन होऊनही कुडाळमध्ये मच्छीमार्केट होऊ शकले नाही, कुडाळमध्ये भव्य बाजारपेठ असून एकही सुलभ शौचालय नाही, नळपाणी योजनेसाठी पूर्वी बंधारा घालण्यात आला होता. तो कमकुवत झाल्यामुळे नवीन बंधारा बांधतेवेळी बंधान्याची रुंदी वाढवली असती तर नवीन झालेल्या हायवेच्या दृष्टीकोणातून कुडाळवासियांना विकासाच्या दृष्टीकोणातून फायदा झाला असता. कुडाळ रेल्वेस्टेशन सुसज्ज गार्डनचे भुमिपूजन होऊनही अद्याप पर्यंत केले नाही. कुडाळची वस्ती लक्षात घेऊन तेव्हा जुने एसटी स्टॅण्ड बांधण्यात आले. आज कुडाळची वस्ती दहा पटीने वाढली आहे. त्याचा अभ्यास करून एसटीस्टॅण्डची भव्यता व सुशोभिकरण अपेक्षित होते.

कुडाळ तालुक्यातील जिल्हा केंद्र ओरोसमध्ये गेल्यानंतर तालुक्याच्या दृष्टीकोणातून जी शासकीय ऑफीसे कुडाळमध्ये केली गेली पाहिजे होती ती अद्यापपर्यंत केली गेली नाहीत. कुडाळमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालय लोकवस्तीच्या धरतीवरती का केले गेले नाही? कुडाळचे योग्य इमारती असताना पणदूरमध्ये आरोग्य केंद्र करण्याचा उद्देश काय? त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ज्या सुविधा कुडाळवासीयांना पाहिजे होत्या त्यापासून वंचित राहावे लागले. पर्यटन जिल्हा झाल्यानंतर इतर तालुक्यामध्ये ज्या सुविधा व विकास केला गेला त्याप्रमाणे कुडाळ शहर विकासाच्या दृष्टिकोणातून मागास राहिले. इतर तालुक्यामध्ये राजकीय मंडळीनी आपली बुध्दिमत्ता गावातील विकासासाठी ऐकोपा करुन वरीष्ठ राजकीय मंडळींचा योग्य वापर निधी उपलब्ध करुन विकास साधण्याचा प्रयत्न केला तसा कुडाळमध्ये झाला नाही हे कुडाळवासीयांचे दुर्भाग्य आहे. राजकारणापुरते राजकारण करून गावाची आर्थिकबाजू सक्षम करण्यासाठी काळानुसार बदलत जाऊ न गावाचा विकास साधणे हे अपेक्षित असतानाही कुडाळच्या बाबतीत याची कमतरता जाणवते. गावाचा विकास झालातर गावामध्ये आर्थिक समृध्दी येते, आर्थिकदृष्ट्या आवक वाढेल. पर्यटनाच्या माध्यमातून कुडाळच्या. आर्थिक उलाढालीच्या दृष्टीकोणातून राजकीय पुढारी, कुडाळमधील सुज्ञ व जाणकार नागरीक, कुडाळ शहरावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीं राजकारणविरहित विकास करण्यासाठी आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवणार का?आतातरी पुढाकार घेणार का ? भविष्यात इतर तालुक्याने ज्या पध्दतीने आपला विकास केला त्याचा विचार करावा असे कुडाळ तालुका सुधार समिती अध्यक्ष श्री.प्रसाद शिरसाट यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून लक्ष ! वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page