माणगावात खोऱ्यातील आंबेरी पूल गेला पाण्याखाली..

माणगावात खोऱ्यातील आंबेरी पूल गेला पाण्याखाली..


कुडाळ/-

गेले दोन ते तीन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलावर पाणी आले आहे. पुलावर पाणी आल्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कर्ली नदीच्या काठावरील आजूबाजूच्या गावांमध्ये सध्या पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील गावांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.

अभिप्राय द्या..