You are currently viewing टोलच्या झोलसाठीच खा.विनायक राऊत यांनी नितेश राणेंची पाठ थोपटली.;परशुराम उपरकर यांचा आरोप..

टोलच्या झोलसाठीच खा.विनायक राऊत यांनी नितेश राणेंची पाठ थोपटली.;परशुराम उपरकर यांचा आरोप..

कणकवली /-

वेंगुर्ला येथील नियोजित कार्यक्रमात खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे हे आमचे मित्र असल्याचे सांगत त्यांची पाठ थोपटली आहे,तशी जाहीर कबुली देखील दिली. त्यामुळे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक संतापले आहेत. टोलच्या झोलसाठीच विनायक राऊत यांनी नितेश राणेंची पाठ थोपटली,असल्याचा घणाघाती आरोप माजी आमदार,मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली येथे ऑनलाइन पद्धतीने पत्रकारांशी संवाद साधताना मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर म्हणाले,बरीच वर्ष शिवसैनिक राणे हे नेहमीच विरोधात राहिले आहेत .शिवसेना या चार शब्दांसाठी मार खाल्ला,गाड्या फुटल्या,संघर्ष केला.पण आता खासदारांनी आमदार नितेश राणे यांचे कौतुक केल्यामुळे सिंधुदुर्गातील शिवसैनिकात शंकेची पाल चुकचूकली आहे. राणे यांच्या विरुद्ध रस्त्यावर उतरून शिवसैनिक लढले व गुन्हे घेतले. त्याच शिवसैनिकांमध्ये आता खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात नाराजी निर्माण झाली आहे. राऊतांनी नितेश राणेंचे कौतुक केले हे राणेंनी टोलला विरोध करु नये यासाठीच आहे. हायवे टोलमध्ये खासदार विनायक राऊत यांच्या मुलांचे भवितव्य असल्याने राणेंचे कौतुक खासदार विनायक राऊत करत असल्याची टीका परशुराम उपरकर यांनी केली.

अभिप्राय द्या..