कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यायातील विद्यार्थ्यांचे फी वसुलीच्या विरोधात महाविद्यालयात निवेदन..

कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यायातील विद्यार्थ्यांचे फी वसुलीच्या विरोधात महाविद्यालयात निवेदन..

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची ८०% फी..माफ करण्याची केली मागणी..

कुडाळ /-

कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यायातील विद्यार्थ्यांचे फी वसुलीच्या विरोधात महाविद्यालयात निवेदन देण्यात आले आहे.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ हे पूर्णता कोरोना महामारीत गेले आहे. व या कोरोनाच्या महामारीमुळे उद्योग धंदे बंद पडल्यामुळे,नोकऱ्या गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक आधीच त्रस्त आहेत.असं असताना महाविद्यालय विद्यार्थ्यां कडून पूर्णता १००% फीस आकारात आहे.संत राऊळ महाराज महाविद्याल,कुडाळच्या सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने फीस वसुलीच्या विरोधात एकत्र येत महाविद्यालयाला निवेदन दिले आहे. या निवेदनात विद्यार्थी असे म्हणाले की शैक्षणिक वर्ष २०२०-२१ची पूर्णता फीस माफ व्हावी, किंवा किमान ८०% तरी फीस माफ व्हायला हवी. सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे की ८०% फीस माफ व्हायला हवी.महाविद्यालय विद्यार्थ्यांना मार्कशीट देत नाही आहेत. ते बोलतात कि पूर्ण १००% फीस भरा मग मार्कशीट देऊ जे पूर्णता चुकीचे आहे.आमची अशी मागणी आहे की किमान ८०% फीस माफ व्हायला हवी. आम्ही विद्यार्थ्यांनी एक निवेदन संत राऊळ महाराज महाविद्यालया, कुडाळ येथे दिलं व एक निवेदन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मा.सुहास पेडणेकर यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.हे निवेदन देतेवेळी या वेळी हार्दिक कदम, विपुल भावे, प्रतीक्षा कोंडास्कर, विदिशा दामले, श्रुती कदम, रुपाल सावंत, गीताई चव्हाण, अमृता जोशी, अंकीता गावडे, मेलव्हीन डिसोझा, हेडन फर्नांडिस, सोनिया फर्नांडिस, तेजल पुजारे, प्रज्ञा गावडे, पेट्रीसिया डिसोझा आदी विद्यार्थी उपस्थित होते. की लवकरात लवकर ह्यावर निर्णय घ्यावा, व शैक्षणिक वर्षा२०२०-२१ची किमान ८०% फीस माफ व्हायला हवी.असे या निवेदनात सांगण्यात आले.

अभिप्राय द्या..