दोडामार्ग तिलारी महामार्गावर ब्रेक फेल झाल्यामुळे कारला अपघात.;गाडीचेही मोठे नुकसान…

दोडामार्ग तिलारी महामार्गावर ब्रेक फेल झाल्यामुळे कारला अपघात.;गाडीचेही मोठे नुकसान…

दोडामार्ग /-

ब्रेक फेल झाल्यामुळे कारला झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले, तर दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात आज तिलारी-रामघाट परिसरात घडला. दरम्यान जखमींना येथील सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक यांनी मदत कार्य करत अधिक उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित कार ही बेळगाव येथून तिलारी रामघाट मार्गे गोव्याच्या दिशेने जात होती. यावेळी अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा कारवाली ताबा सुटला व कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक कठड्यावर धडकली. यात कार मध चौघांपैकी दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. तर दोघे किरकोळ जखमी झाले.मात्र या अपघातात कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

अभिप्राय द्या..