You are currently viewing दोडामार्ग ते विजघर एस टी बस सेवा सुरू करण्याबाबत केली मागणी;भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण गवस,पराशर सावंत

दोडामार्ग ते विजघर एस टी बस सेवा सुरू करण्याबाबत केली मागणी;भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण गवस,पराशर सावंत

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्यातील एस.टि बस सेवा बंद असल्यामुळे प्रवाशाची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे, दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांना तहसीलदार कार्यालयात किंवा इतर कामांसाठी ये-जा करण्यासाठी एसटी बस आवश्यक असून सध्या कोरोनाच्या काळात ही बस सेवा बंद असल्याने दोडामार्ग वासीयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे हे लक्षात घेता ती गैरसोय दुर करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष प्रवीण गवस व कोनाळ सरपंच पराशर सावंत यांनी सावंतवाडी आगार प्रमुख वैभव पडवळे यांच्याशी फोनवर चर्चा करून ग्रामपंचायत कोनाळचे निवेदन त्यांच्या व्हाट्सअप्प नंबरवर पाठवुन दिले असता व दोडामार्ग तिलारी विजघर एस.टि.बस लवकर सुरु करण्यासंदर्भात चर्चा केली असता सोमवार पासुन एस.टी.सेवा सुरु करण्यात येईल असे आश्वासन सावंतवाडी आगार प्रमुख वैभव पडवळे यांनी दिले आहे.

अभिप्राय द्या..