You are currently viewing शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.जान्हवी सावंत वाढदिव विशेष !

शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.जान्हवी सावंत वाढदिव विशेष !

सिंधुदुर्ग /-

समील जळवी /-

जय-पराजय, संधी असण्याच्या – नसण्याच्या पलीकडे जाऊन राजकीय वलंय निर्माण करणाऱ्या व्यक्ती असतात त्यात जान्हवी सावंत यांचे नाव आहे.अभ्यासू, परखडपणे, रोखठोक आणि परिणामांचा विचार न करता आपले विचार ही जिल्हापरिषदेची विरोधी गटनेत्या म्हणून आणि पक्षाची पदाधिकारी म्हणूनही मांडली. सुशिक्षित, अभ्यासू आणि उत्कृष्ट महिला संघटक म्हणून त्यांची नाव आहे. जि.प.सदस्य असताना प्रत्येक हेड खाली यशस्वी पाठपुरावा करून कसाल मतदार संघात विकासासाठी निधी आणि त्याच बरोबर जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाच्या योजना जनतेच्या पर्यंत पोहोचवल्या आणि शेती शाळा ते ग्रामसभा आणि प्रत्येक शासकीय कार्यक्रमात हाजिरी त्या मुळे दांडगा जनसंपर्क मुळे एक आदराचे स्थान मिळवले. पक्षीय पातळीवरचा विरोध हा ‘व्यासपीठ आणि सभागृहाच्या’ बाहेर न ठेवता विकासात सहकार्याची भूमिका ठेवली आणि ह्यामुळेच पक्षाच्या पलीकडे आदर आणि हितचिंतणार्या व्यक्ती जोडल्या.महाविद्यालयात पासूनच सामाजिक कार्य, अनेक स्पर्धांमध्ये यश ते सांस्कृतिक कार्यात वावर त्यामुळे कोणतेही ‘बॅक ग्राउंड’ आणि आर्थीक कुवत नसताना राजकारणात एन्ट्री सुलभ झाली. जि प सदस्या, जि.प.गट नेत्या, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, नेहरू युवा सल्लागार समिती, राज्य ग्रंथालय परिषद, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, जिल्हा आरोग्य समिती या अनेक समित्या मध्ये अभ्यासुपणाची छाप पाडली. लोकप्रतिनिधी असूनही राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा, आणि नंतर २०१६ ला शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख म्हणून महिलांची संघटना बांधणीत उत्कृष्टपणे बांधली.

जान्हवीताई म्हणजे शिवसेनेची मुलुख मैदान तोफ, शिवसेनेच्या प्रचार प्रसारातील एक आक्रमक नेतृत्व, जिल्हा परिषदेतील विरोधी गटाची गटनेत्या म्हणून ची कारकीर्द अभ्यासू सदस्य म्हणून नावारूपाला आली, तशी संख्याबळाची चिंता न करता विरोधकांची भूमिका कोणाचाही मुलाहिजा ठेवता ‘रोखठोक’मांडल्यामुळे आजही त्यांचे नाव घेतले जाते. जिल्हा नियोजन समिती च्या सर्वच चर्चेत आणि स्पष्टपणे बोलणारे व्यक्तिमत्त्व. लोकप्रतिनिधी म्हणून सुरुवातिची ओळख होऊन त्यांनी राष्ट्रवादीच्या पहिला युवती काँग्रेस जिल्हाध्यक्षा म्हणून जेष्ठ नेत्या अन्नरोजीन लोबो मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन कार्याला सुरुवात केली, तेव्हाही युवती काँग्रेस मध्ये अगदी मा.खा.सुप्रिया ताईंच्या कौतुकास पात्र ठरल्या. ताईंच्या युवती काँग्रेस आणि ‘यशस्विनी अभियान’ च्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी नेहमी अग्रस्थानी नंबर मिळवला. राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या संघटना बांधणीत लोबो मॅडम सोबत नेहमी सक्रिय राहिल्या.

२०१४ साली च्या राजकीय स्थित्यांतरात आणि आ.दिपकभाईंची भूमिका आक्रमकपणे जनमानसात मांडण्यात त्यां,,पुढे,होत्या.मा.खा.विनायकजी राऊत साहेब आणि मा.आ.वैभवजी नाईक यांच्या प्रचारात त्यांनी मेहनत घेतली.शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी २०१६ साली शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी दिली. खा.श्री.विनायकजी राऊत साहेब, संपर्क प्रमुख श्री.अरुणभाई दुधवडकर साहेब, तत्कालीन महिला संपर्क प्रमुख सौ.किशोरी ताई पेडणेकर, आ.श्री.वैभवजी नाईक यांनी केलेल्या शिफारशीस पात्र असे काम त्यांनी केले.आज शिवसेना महिला आघाडी चे कुडाळ-मालवण आणि सावंतवाडी विभागात प्रत्येक शहराच्या आणि प्रत्येक गावाच्या प्रत्येक वॉर्ड मध्ये महिला शाखा संघटक इतकं भक्कम नेटवर्क आहे. आजघडीला सर्वच राजकीय पक्षांमधील महिला विंगची तुलना करीता शिवसेना महिला आघाडीची संघटना तळागाळापर्यंत मजबूत आहे.

स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान आणि स्त्री राजसत्ता बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या संस्थापक अध्यक्षा म्हणूनही सामाजिक आणि सहकार क्षेत्रात काम करत आहेत महिलांचे एक नेटवर्क जिल्ह्यात आहे, महिलांच्या आर्थीक आणि स्वनिर्भर होण्यासाठी चे उपक्रम चालू आहेत.राजकीय क्षेत्रातील महिलांमध्ये जय-पराजय आणि संधी असणे-नसणे या जरतर च्या पलीकडे एक वेगळं नाव आणि वलय त्यांनी आपल्या कार्याने निर्माण केले आहे.शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.जान्हवी सावंत यांना लोकसंवाद लाईव्ह न्यूज चॅनल कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रतिक्रिया व्यक्त करा