मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांनी दिली वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट..

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांनी दिली वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट..

वेंगुर्ला /-


मुंबई विद्यापीठाचे सिंधुस्वाध्याय केंद्र वेंगुर्लेत सुरु करण्यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष दिलीप गिरप तसेच मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांच्या समवेत वेंगुर्ले न.प.च्या वेंगुर्ले कॅम्प येथील जागेसंदर्भात तसेच याठिकाणी इमारती पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात काही कालावधीसाठी नगरपालिकाचे पर्यटन सुविधा केंद्र(संगीत रिसॉर्ट) तात्पुरत्या स्वरुपात उपयोगात आणण्यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी आज भेट घेतली.प्रत्यक्ष जागेवर जाऊन या दोन्ही गोष्टींचा आढावा घेतला.यासंदर्भात आमदार दीपक केसरकर यांच्या समवेत हे केंद्र लवकरात लवकर सुरु होण्यासाठी उद्या फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.यावेळी वेंगुर्ले नगरपरिषद येथे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, गटनेते सुहास गवंडळकर,मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,मुंबई युनिव्हर्सिटी सिनेट सदस्य गणेश,जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्चे सुनिल नांदोसकर,नगरसेवक प्रशांत आपटे आदी उपस्थित होते.यावेळी कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांनी न.प.च्या कलादालनास भेट देऊन कौतुक केले.पर्यटन वाढीसाठी अशा प्रकारचे कार्य जिल्ह्यातील अन्य नगरपालिकांनी करावे,असे आवाहन केले.तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य वेंगुर्ले नगरपरिषद करीत आहे,याबद्दल आनंद वाटला,असे गौरवोद्गारही काढले.

अभिप्राय द्या..