भाजपाने भरवली प्रतिविधानसभा भास्कर जाधव म्हणाले, त्यांचा स्पीकर जप्त करा!

भाजपाने भरवली प्रतिविधानसभा भास्कर जाधव म्हणाले, त्यांचा स्पीकर जप्त करा!

मुंबई /- 

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या १२ आमदारांवर गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आल्यानंतर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भाजपाने विधिमंडलाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. मात्र या प्रतिविधानसभेविरोधात महाविकास आघाडीतील आमदारांनी कारवाईची मागणी केली आहे.

तसेच या प्रतिविधानसभेवर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदवत अध्यक्षांची परवानगी नसताना अशी सभा घेतलीच कशी जाऊ शकते, असा प्रश्न विचारला. तसंच त्यांचे माईक जप्त करण्याचे आदेश द्या, अशी मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली.

काय म्हणाले भास्कर जाधव?

विधानसभेच्या पायरीवर बसण्याचा निश्चित अधिकार आहे, तिथे घोषणाबाजी करण्याच देखील अधिकार आहे परंतु संसदीय कामकाज चालू असताना स्पीकर लावून मोठमोठ्याने घोषणा देणे आणि तश्या प्रकारचा आंदोलन करणं यासाठी अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते ती परवानगी भाजपने घेतली आहे का? जर घेतली नसेल तर असं आंदोलन करुच कसं शकतात. त्यांचा स्पीकर ताबडतोब जप्त करण्याचे आदेश अध्यक्ष महोदय आपण द्यावेत, अशी मागणी भास्कर जाधव यांनी नरहरी झिरवळ यांनी केली.

सरकारचा कोंडी करण्याचा प्रयत्न – राऊत

विरोधी पक्षाद्वारे महाविकास आघाडी सरकारला एका वेगळ्या पद्धतीने कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ते बॉम्ब आमच्यावर टाकण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, ते बॉम्ब त्यांच्यावरच फुटले. एक चुक किती महाग पडू शकते हे यातून समजून येईल. ते पुढे म्हणाले की, आमच्या कोकणात एक म्हण आहे ‘केले तुकां झाले माका’ अशी त्यांची गत झाली असल्याचा टोला राऊत यांनी यावेळी लगावला.

अभिप्राय द्या..