मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर उद्या वेंगुर्लेत..

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर उद्या वेंगुर्लेत..

वेंगुर्ला /-


महाराष्ट्राला एकूण ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे असून त्यातून रोजगाराच्या अनेक संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी ‘सिंधुस्वाध्याय’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई विद्यापीठाने ५ सप्टेंबर २०१४ रोजी सुरू केला. या उपकेंद्राचे एक केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे होणार आहे.या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर बुधवार ७ जुलै रोजी वेंगुर्ल्यात येणार आहेत. यावेळी आमदार दीपक केसरकर,वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांच्यासोबत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. सिंधुस्वाध्याय अभ्यासक्रम येथे सुरु व्हावा, यासाठी आमदार दीपक केसरकर हे २०१५ पासून प्रयत्नशील आहेत. अभ्यासक्रमात सागरी जीवशास्त्र व मत्सोद्योग, सागरी शास्त्र, सामाजिक व आर्थिक अभ्यासकेंद्र, नौकानयन व मासेमारी, किनारपट्टी तसेच जीवशास्त्रीय व भूशास्त्र, खनिज तेल व वायु सागरी तंत्रज्ञान, सागरी कायदा व सुव्यवस्था, किनारपट्टी विभाग व्यवस्थापन आधी कोर्सेस होणार आहेत.त्याचा लाभ येथील युवकांना होणार आहे. या संदर्भात जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव वेंगुर्लें न.प.ला दिला होता. त्यासाठी आरक्षण क्र.४९ क्षेत्र १७५ गुंठे ही आरक्षित असलेली जमीन व वेंगुर्ले न.प.चे संगीत रिसॉर्ट ही बिल्डींग सिंधु स्वाध्यायच्या कार्यालयासाठी घेण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

अभिप्राय द्या..