दोडामार्ग /-

गेली पाच वर्षे तीन टप्यात सर्व महाराष्ट्रातील माध्यमिक विद्यालयातील शाळांमध्ये चालू असलेल्या I.C. T लॅब (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) माहिती संप्रेक्षण प्रोजेक्ट केंद्रीय सरकारद्वारा व्हिजन इंडिया सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीला पाच वर्षांच्या करारावर देऊन ३० जून २०१९रोजी या प्रोजेक्टचा तिसरा टप्पा पूर्ण झाला, प्रत्येक टप्याचा कालावधी हा पाच वर्षाचा असून
गेल्या तीन टप्यात चालू असलेला या प्रॉजेक्ट ला ३०जून २०१९ रोजी पंधरा वर्षे झाली आहेत तर अशा ह्या तीनही टप्यात कार्यरत असलेल्या संगणक आय.सी. टी शिक्षकांची संख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०१ तर संपूर्ण महाराष्ट्रात ८००१ अशी असून गेली दोन वर्षे पाच महिने झाले हा,प्रोजेक्ट बंद करून परंतु अध्याप देखील ह्या शिक्षकांबाबत योग्य तो निर्णय शासनाने घेतला नसून गेली अनेक वर्षे शासन मात्र ह्या विषयाकडे टाळा टाळ करत आहे, आय.सी. टी शिक्षकांना P.A.B (प्रोजेक्ट एपृवल बोर्ड) किंवा शासन स्तरावर सामावून घेण्याची मागणी आय.सी. टी शिक्षकांन कडून होत होती ह्यासाठी आय सी टी शिक्षकांनी अनेक स्तरावर प्रयत्न देखील केले तसेच आंदोलन उपोषणे देखील करण्यात आली परंतु शासन मात्र यांचा कडे दुर्लक्ष करत आले असून प्रोजेक्ट बंद करून अडीच वर्षे पूर्ण झाली परंतु काही शिक्षकांचे वेतन देखील अध्याप मिळाले नसून आय.सी.टी शिक्षकां मधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे, आता चालू असलेल्या कोरोना महामारीत ऑनलाइन पद्धतीचा वापर करून मुलांना शिकवले जाते ह्या ऑनलाइन पद्धती मध्ये मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी आय.सी. टी शिक्षकांचे महत्वाचे योगदान लाभले असते तर पुस्तकी ज्ञाना सॊबत मुलांना संगणकीय ज्ञान असणे आवश्यक मानत ह्या प्रोजेक्ट ची निर्मिती करण्यात आली होती परंतु आद्यवत परिस्थितीत हा प्रोजेक्ट बंद करून शासनाने मुलांचे नुकसान केल्याने पालक वर्गात देखील तीव्र नाराजी दिसत आहे,
डिजिटल इंडिया मध्ये समाविष्ट असलेला हा प्रोजेक्ट सरकारने आपल्या हाती नघेता बंद केल्यामुळे पाच ते पंधरा वर्षे प्रोजेक्ट मध्ये काम केल्या नंतर नोकरी मिळवण्याचे वय निघून गेल्याने आय.सी. टी शिक्षकांना नवीन नोकरी मिळवणे देखील खूप कठीण झाले आहे नोकरी मिळवण्यासाठी वयाची विशिष्ट मर्यादा असते परंतु गेली पंधरा वर्षे ह्या प्रोजेक्ट मध्ये काम केल्या मुळे नोकरी मिळवण्याचे वय देखील निघून गेल्याने नवी नोकरी तरी कशी मिळणार असा प्रश्न सर्व आय.सी. टी शिक्षकांना पडला असल्याने आय.सी.टी शिक्षक हे पूर्णतः बेरोजगार झालेले दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page