पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८४ वी पुण्यतिथी साजरी..

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८४ वी पुण्यतिथी साजरी..

पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजन..

सावंतवाडी /-

महात्मा गांधींनी “रामराजा” अशी उपमा दिलेले आणि ज्यांच्या राज्याला “रामराज्य” असे संबोधले होते. असे संस्थांचे भूतपूर्व राजे ‘श्री पंचम खेमराज तथा पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज’ यांची ८४ वी पुण्यतिथी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात आज साजरी करण्यात आली आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्ष राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोसले, सहसंचालक प्रा. श्री. डी. टी. देसाई, सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, अँड. श्री. शामराव सावंत, सामाजिक कार्यकर्ते श्री. अण्णा केसरकर, प्रा. श्री. अन्वर खान, प्राचार्य डॉ. श्री. डी. एल. भारमल, लॉ कॉलेजच्या प्राचार्या प्रा. सौ. अश्विनी लेले, महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या ‘खेमराजीय’ या वार्षिक अंकाचे आभासी पद्धतीने प्रकाशन करण्यात आले आहे. तसेच वनस्पतिशास्त्र विभागाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ‘निलांबरी’ या मासिकाचे देखील प्रकाशन करण्यात आले आहे. त्याचबरोबर वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्री. यु. एल. देठे यांच्या ‘रानमोडी वनस्पतीचे सागर किनाऱ्यावरील वनस्पतीवर परिणाम’ या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..