मसुरे /-

कांदळगाव येथील ओंकार परब मित्रमंडळाच्या वतीने
राज्यस्तरीय ऑनलाइन
देशभक्तिपर वैयक्तिक
गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
गट क्र. १ शालेय गट( १० वी पर्यंत) असून प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे २ हजार रुपये, १ हजार रुपये, ५०० रुपये व उत्तेजनार्थ ३०० रुपये
आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या गटासाठी प्रवेश फी ५० रुपये आहे.
गट क्र. २ खुला गट प्रथम तीन क्रमांकान अनुक्रमे ३ हजार रुपये, २ हजार रुपये, १ हजार रुपये,उत्तेजनार्थ ५००रुपये आणि
प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रवेश फी १०० रुपये आहे.
नाव नोंदणी दि. १० जुलै २०२१ पर्यंत करणे आवश्यक आहे. स्पर्धा कालावधी दि. १५ जुलै ते १२ ऑगस्ट २०२१ असणार आहे.अधिक माहितीसाठी (८२७५३१४७८८), (७४९८८७९२८०) या नंबर वर संपर्क साधावा. स्पर्धचे नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत. मराठी किंवा हिंदी भाषेतील देशभक्तीपर गीत ३ ते ६ मिनिटांचे असावे.
शालेय गटातील स्पर्धकांनी रु. ५० आणि खुल्या गटातील
स्पर्धकांनी रु. १०० एवढी प्रवेश फी ९४२१६३०३५० या गुगल पे नंबरवर भरुन, फी पेमेंटचा स्क्रीनशॉट, नाव, मोबाईल नंबर आणि शालेय गटातील स्पर्धकांनी ओळखपत्राचा फोटो (८२७५३१४७८८)
या नंबरवर पाठवून आपला प्रवेश निश्चित करावा.
स्पर्धकांनी आपला व्हिडिओ (८२७५३१४७८८) या टेलिग्राम
नंबरवर पाठवावा. व्हिडिओच्या सुरुवातीला स्पर्धकाने आपले नाव
गटाचे नाव, वादक असल्यास वादकाचे नाव सांगावे.
स्पर्धकांना फक्त पारंपरिक दोन वाद्याचाच वापर करता येईल. वादक उपलब्ध नसल्यास इलेक्ट्रॉनिक तानपुरा आणि तबला वापरता येईल. व्हिडिओ स्वीकारण्याची अंतिम तारीख १२ ऑगस्ट २०२१ ही आहे.या स्पर्धेचा निकाल १५ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५:००
वाजेपर्यंत जाहीर केला जाईल.आयोजकांना आवश्यकतेनुसार नियम व अटींमध्ये बदल करण्याचा
अधिकार राहील असे
ओमकार परब मित्रमंडळ, कांदळगाव यांच्या कडून जाहीर करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page