राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत कळसुलकर प्राथमिक शाळेचे यश..

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत कळसुलकर प्राथमिक शाळेचे यश..


सावंतवाडी /-


मंथन पब्लिसिटी कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा, सावंतवाडी या शाळेच्या कु. निधी चंद्रकांत बिले (चौथी)प्रथम, तर तिसरीच्या कु.दूर्वा अतुल केसरकर हिने दुसरा क्रमांक प्राप्त करून शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला. कोरोना काळामध्ये शाळा बंद असताना सुद्धा या शाळेचे विद्यार्थी नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी होत आहेत, शाळेचे शिक्षक त्यानुषंगाने मुलांना प्रेरणा देताना दिसत आहेत. राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेमध्ये गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय आलेल्या कुमारी निधी बिले व कुमारी दूर्वा केसरकर या दोघींचेही संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पै, सचिव डॉक्टर प्रसाद नार्वेकर सर्व संस्था पदाधिकारी मुख्याध्यापक श्री.सावंत सर वर्गशिक्षक श्री.कांबळे सर श्री. वरक सर तसेच सहाय्यक शिक्षक श्रीम.गुंजाळ, श्रीम. बिले, श्रीमती गावकर यांनी अभिनंदन केले

अभिप्राय द्या..