शिवसेना आचरा विभागाच्या वतीने आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव..

शिवसेना आचरा विभागाच्या वतीने आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव..

आचरा /-

कोरोना महामारीमुळे स्वतःची माणसे दुरावत असताना कोरोना रुग्णांसाठी जीवाची पर्वा न करता सेवा देणारया आरोग्य विभागाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शिवसेना मालवण तालुकाध्यक्ष हरी खोबरेकर यांनी आचरा येथे व्यक्त केले.
शिवसेना आचरा विभागाच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे आरोग्य अधिकारी, कर्मचारी,आशा स्वयंसेवीका यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ शामराव जाधव, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, वायंगणी सरपंच संजना रेडकर, पाडूरंग वायंगणकर,,उपविभाग प्रमुख जगदीश पांगे,महिला विभाग प्रमुख अनुष्का गांवकर,विनायक परब,राजन गांवकर, राजन पांगे,प्रकाश वराडकर,मंगेश गांवकर,समिर लब्दे,शाम घाडी ,अनिल गांवकर यांसह अन्य शिवसेना कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आशा स्वयंसेवीका अस्मिता आचरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचे आम्हांला नेहमीच पाठबळ मिळत असल्याने आमचे मनोबल वाढत असल्याचे मत व्यक्त केले.

अभिप्राय द्या..