परुळेत वैद्यकीय क्षेत्रात सेवा करणाऱ्यांचा सत्कार..

परुळेत वैद्यकीय क्षेत्रात सेवा करणाऱ्यांचा सत्कार..

वेंगुर्ला /-

राष्ट्रीय वैद्यक दिन अर्थात डॉक्टर डे च्या निमिताने वैद्यकीय क्षेत्रात सेवा करणाऱ्या डॉक्टर वैद्यकीय अधिकारी गाव पातळीवर काम करणारे आरोग्य सेवक आरोग्यसेविका यांचा सन्मान करण्यात आला यावेळी लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी शाखा परुळे यांच्या वतीनेही या आरोग्य दूतांचा शुभेच्छापत्र व शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी वैधकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे चे डॉ के डी कोळी डॉ ए ए चिंदरकर आरोग्यसेवक एस एस बनसोडे एम आर परब यांचा सन्मान करण्यात आला परुळेबाजार ग्रा प येथे परुळेबाजार येथे वैधकीय सेवा देणारे डॉ साईल यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच श्वेता चव्हाण ग्रा पं सदस्य सुनील चव्हाण शांताराम पेडणेकर कृषी सहायक सुरज परब ग्रामसेवक शरद शिंदे लोकमान्य सोसायटीचे शाखा व्यवस्थपाक मयूर पिंगुळकर सौ स्मिता ठाकूर साहिल माडये डाटा ऑपरेटर प्रियांका परुळेकर ग्रा पं कर्मचारी आरोग्यसहायका सौ गोसावी सिस्टर मुंननकर सिस्टर कर्मचारी बाली नार्वेकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते कोरोना काळात सर्व आरोग्य क्षेत्रातील आरोग्यकर्मी सेवार्थीनी जिवाची पर्वा न करता आपले कर्तेव्य पार पाडत आहेत त्यांच्या प्रति कृतन्याता व्यक्त करण्यात आली.

अभिप्राय द्या..