युवा फोरम भारत संस्थेच्या स्वयंसेवक नोंदणीसाठी कुडाळ येथे बैठक संपन्न..

युवा फोरम भारत संस्थेच्या स्वयंसेवक नोंदणीसाठी कुडाळ येथे बैठक संपन्न..

कुडाळ /-

युवा फोरम भारत संस्थेच्या स्वयंसेवक नोंदणीसाठी कुडाळ येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात सरकारच्या सर्व कोव्हिड-19 नियमांचे पालन करून बैठक संपन्न झाली. आज पासून सिंधुदुर्ग जिल्यात ज्यांना समाजसेवा करण्याची इच्छा आहे अश्या अनेक तरुण वर्गांना ऑफलाइन व ऑनलाइन स्वयंसेवक नोंदणीचा आज पासून शुभारंभ करण्यात आला. आज अनेक युवकांनी संस्थेचे स्वयमसेवकत्व स्वीकारले. यामध्ये अध्यक्ष यशवर्धन राणे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले कि युवा फोरमच्या माध्यमातून नुसते समाज कार्य नव्हे तर आपण चांगले युवक घडवणे हापण हेतू आहे आणि याची सुरुवात आपण स्वतःकडून करायला पाहिजे असे त्यांनी प्रबोधन केले. तसेच संस्थेचे मुख्य सचिव ॲड.हितेश यांनी सांगितले आपली संस्था हि सेवाभावी व सामाजिक संस्था आहे या संस्थेचे कुठलाही राजकीय पक्षाशी संबंध नाही. समजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करणे हाच आपल्या सर्वांचा हेतू असावा हे त्यांनी सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष निकम यांनी ही संस्था कशी स्थापन झाली व संस्थेचे घटनाक्रम व कार्य सांगितले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे, उपाध्यक्ष अमोल निकम, सचिव ॲड. हितेश कुडाळकर, खजिनदार गणेश सावंत, सहखजिनदार संकेत राणे, रोहन करमळकर, सुयश घाटकर, सौरभ शिरसाट,सोलापुर प्रदेशाध्यक्ष श्रेयस खरबाडे, कौशल माने,हर्षल देसाई, भूषण गावडे, साहिल देवकाते, संजीव गोसावी, फयाझ तैलकोट, मिहीर खानोलकर व अन्य संस्थेचे सदस्य व नवीन स्वयंसेवक व युवक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..