ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव मालवण तालुक्यात प्रथम..

ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव मालवण तालुक्यात प्रथम..

माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्या हस्ते झाला सत्कार..

मसुरे /-

चिंदर ग्रामपंचायतचे ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव यांनी आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये ४३४० मनुष्यदिनाची निर्मिती करुन तालुक्यातील ६५ ग्रामपंचायती मध्ये सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवीला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत दिगंबर जाधव यांनी बजावलेल्या कामगिरी बद्दल माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या हस्ते चिंदर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
जाधव म्हणाले, या यशा मागे सरपंच राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वै, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, सहकारी विश्राम माळगांवकर, तालुका कृषी अधिकारी संजय गोसावी, भाजप तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर याची साथ मोलाची ठरली आहे. द्वितीय क्रमांक हडी ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक अजित मुळिक तर तृतिय क्रमांक पळसंब ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक अमित अरूण पुजारे यांनी आपल्या कामगिरीवर प्राप्त केला.तालुकास्तरावरुन या कामगिरीचे कौतुक करण्यात आले.

अभिप्राय द्या..