भाजपच्या कुडाळ तालुका ओरोस मंडळ तालुकाउपाध्यक्ष साजुराम नाईक यांचा शिवसेनेत प्रवेश..

भाजपच्या कुडाळ तालुका ओरोस मंडळ तालुकाउपाध्यक्ष साजुराम नाईक यांचा शिवसेनेत प्रवेश..

भारतीय जनता पार्टी कुडाळ तालुका ओरोस मंडळ तालुका उपाध्यक्ष श्री साजुराम उर्फ (भावोजी) नाईक यांनी  वेताळबाबर्डे येथील जाहीर कार्यक्रमात मान्यवारांच्या उपस्थिती मध्ये शिवसेना पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला.आमदार वैभव नाईक साहेब यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधून व भगवा झेंडा देऊन त्यांचे पक्षांमध्ये स्वागत केले. तसेच पूर्वी त्यांनी शिवसेना पक्षामध्ये केलेल्या कामगिरी बद्दल गौरवोद्गार व्यक्त करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री भावोजी नाईक यांचे स्वागत करताना जी प सदस्य नागेंद्र परब यांनी गावातील सर्व शिवसैनिकांचे कोरोना काळातील सामाजिक कामगिरी बद्दल कौतुक केले व गावातील विकासात्मक कामांचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित सर्वानीच भावोजी नाईक यांचे पक्षांमध्ये स्वागत केले.
यावेळी तालुका संघटक सौ स्नेहा दळवी,शाखा प्रमुख पिंटू दळवी,शाखा संघटक शैलेश घाटकर,उपसरपंच दिनेश कदम,ग्रा प सदस्य भाई कलिंगण,माजी सरपंच दिलीप तिवरेकर,माजी ग्रा प सदस्य नाथा भोगले,सोसायटी सदस्य बाळा भोसले व योगेश ठाकूर,प्रदीप गावडे,सतीश बाँबर्डेकर,बाबा शेख,आनंद सामंत,संतोष कदम,दीपक कदम,दशरथ कदम,धनंजय बिरमोळे,भाऊ सामंत, यतीन सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..